निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

रॉय किणीकर आध्यात्मिक होते की नाही, मानवी बुद्धीच्या पलीकडे ते गेले होते की नाही, हे कळायला मार्ग नाही, पण त्यांना अध्यात्म बुद्धीच्या पातळीवर तरी चांगलेच उमगले होते, ह्यात शंका नाही!

किणीकर चार ओळी लिहितात आणि आपल्याला केवढा प्रवास घडतो! कला आणि निसर्ग हा संवेदनशील लोकांचा विसावा असतो. हे रुबाई लिहिणारे लोक मूळचे आध्यात्मिक. किणीकर आध्यात्मिक होते ह्या विषयी कुणाच्या मनात काही शंका असायचे कारण नाही. आता पर्यंत ते अनेक रुबायांमध्ये दिसलेलेच आहे. पुढेही ते दिसत राहीलच. स्वतः उमर खय्याम सूफी होता. पण ह्या लोकांना अध्यात्माच्या अलीकडे जे आहे ते जगून घ्यायचे आहे.......

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

सुनीताबाईंची ‘जिव्हाळघरटी’ : रेषा आणि रूपातील सौंदर्य काव्यात्म भाषेत समजून घेताना सुनीताबाई आचवलांच्या मैत्रीण झाल्या! (लेखांक : तिसरा)

रेषा हे आचवलांसाठी सौंदर्याने अवकाशावर केलेले लिखाणच होते. रेषा अवकाशाच्या निराकारतेवर निश्चितता आणि अनिश्चितता यांचा खेळ मांडून बसलेली होती. आचवल तो खेळ आपल्या धडकत्या हृदयाने बघत होते. सौंदर्य, विचार आणि कल्पना यांच्या संयोगातून जे आकारांचे स्फटिक मनात तयार झाले त्यांची प्रतिबिंबे म्हणजे आचवलांचे लिखाण. सगळेच सौंदर्यपूर्ण. रूपाने आणि त्याच्या भोवती नाचणाऱ्या प्रकाशाच्या संगीताने आचवलांचे जग नाचत होते.......

उदाहरणार्थ, श्रीयुत संभाजी भिडे आणि श्रीयुत शरद पोंक्षे... विचार वा तत्त्वचिंतन करण्याचे काम महाराष्ट्रामध्ये ‘नेत्या-अभिनेत्यां’नी आपल्या हातात घेतले आहे!

भिडे-पोंक्षे अहिंसेचे एकनिष्ठ आणि विखारी विरोधक असले, तरी त्यांची ओळख ‘हिंसेचे एकनिष्ठ पाईक’ अशी करून द्यायची नसते, हे भानसुद्धा महाराष्ट्राला आहे. पोंक्षे यांच्यासारख्या अभिनेत्याचीही भर महाराष्ट्रातील ‘विचारवंतां’मध्ये पडल्याला आता निदान दोन-पाच तरी वर्षे झाली आहेत. त्यात आता संभाजी भिडे यांच्यासारख्या नेत्याचीही भर पडली आहे. सध्याच्या जमान्यातील एक अभिनेता आणि एक नेता, अशी ही जबरदस्त युती झाली आहे.......

मानवी आयुष्याला अर्थ आहे की नाही, हा प्रश्न फार महत्त्वाचा नाहीये. आयुष्यात अर्थ आहे की नाही, या विषयी आपल्याला काय वाटतं, हे महत्त्वाचं आहे!

मला श्रृती आणि संतोष यांचं रमणं, राजा आणि महेश यांच्या रमून जाण्यापेक्षा श्रेष्ठ वाटत होतं. श्रृती आणि संतोष त्यांच्या आजूबाजूच्या जिवंतपणामध्ये रमले होते. स्वतःच्या मनात किंवा शरीरात रमण्यापेक्षा निसर्गात रमणं मला श्रेष्ठ वाटत होतं, कारण त्यासाठी तीव्र संवेदना, तीव्र बुद्धीची गरज होती. आपल्या अस्तित्वाच्या बाहेरच्या जगामध्ये ‘इन्व्हॉल्व्ह’ व्हायचं असेल, तर भावनिकदृष्ट्या जास्त जिवंत असणं गरजेचं असतं.......

मूळ चाणक्याने साम-दाम-दंड-भेद वगैरे ‘दबंगाई’ मान्य केली होती, परंतु सगळी तत्त्वे पायदळी तुडवावीत, असे तो कधीच म्हणालेला नव्हता, ही गोष्ट ‘मोदीकालीन भारता’तील लोक विसरले होते!

शिरोजीने ऐन ‘अँटिक्लायमॅक्स’च्या सर्वांत खालच्या बिंदूवर बखर संपवल्याचे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल. मोदी-काळात कुणालाही ‘चाणक्य’ म्हणायची प्रथा पडली होती. पैसा आणि इतर दबंगाई करून मार्ग काढणाऱ्या कुणाही नेत्याला त्या काळी ‘चाणक्य’ म्हणायची पद्धत पडली होती. अजून एक म्हणजे विश्वासघात करून आपले राजकीय आणि आर्थिक हित साधणाऱ्या कुणाही तत्त्वहीन नेत्याला ‘मोदीकालीन भारता’त ‘चाणक्य’ म्हणण्यात येत असे.......

या लेखात आम्ही पवारसाहेबांबद्दल चांगले बोलतो आहोत की, त्यांच्यावर टीका करतो आहोत, याविषयी तुमचा गोंधळ उडाला, तर त्यांचे राजकारण आमच्या थोडे का होईना लक्षात आले आहे, असे समजायला हरकत नाही!

आमच्या मते संकल्पना आणि राजकारण, या दोन्ही गोष्टींवर अतिशय मजबूत पकड असलेले शरद पवार हे एकच नेते आम्ही जवळून पाहिलेले आहेत. त्यामुळे अदानी यांना हिंडेनबर्गने ‘लक्ष्य’ केले आहे, असे साहेब म्हणाले, तेव्हा आम्हाला अजिबात आश्चर्य वाटले नाही. साहेब याविषयी नक्की काय म्हणाले आहेत, हे आम्ही शांतपणे वाचत बसलो असताना आमच्या एका विद्वान मित्राचा फोन आला. त्यांनी साहेबांबद्दल नाराजी व्यक्त करायलाच फोन केला होता.......

माया अँजेलोचं बालपण जाणून घेतल्यावर ‘केज्ड बर्ड’ या कवितेतील वेदना समजते. आणि त्यानंतर ‘स्टिल आय राईज’ वाचली, तर त्यातील बंड, स्वातंत्र्याचे पूजन आणि आनंद, हे सारे समजून घेता येते!

माया अँजेलो (१९२८-२०१४) ही स्त्री मनाची सगळी रूपे अत्यंत मनस्वीपणाने मांडणारी कवयित्री. क्लब डान्सर, सेक्स वर्कर, हॉटेलात कुक इथपासून सगळी कामं या आफ्रिकन-अमेरिकन कवयित्रीला करावी लागली. हे सर्व भोग भोगत असताना तिने आपली संवेदना प्राणपणाने जपली. ती मनस्वी कविता लिहीत राहिली. आपल्या कर्तृतवाने पुढे ती अमेरिकेची सगळ्यात लाडकी कवयित्री झाली. जगभरातील स्त्रीवादी चळवळीची ती स्फूर्तिस्थान ठरली........

डेझी फुलाचे आयुष्य मानवाच्या आयुष्यासारखेच आहे. मानवाला आयुष्यभर जसे सुख-दुःखांचे चढ-उतार काढायला लागतात, तसे डेझी फुलाला वर्षभर सगळ्या ऋतूंतील चढ-उतार सहन करायला लागतात

वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग भावनेने भारलेल्या ज्ञानाचा स्रोत होता. आपण निसर्गात जातो, तेव्हा आपल्या मनात ज्या अस्फुट भावना तयार होतात, त्यांना वर्ड्स्वर्थची कविता शब्दरूप देते. वर्ड्स्वर्थसाठी निसर्ग हे एक शांततेचे घरटे होते. फुलांशी गप्पा मारण्याइतके आणि त्यांची चेष्टा करण्याएवढे त्याचे फुलांशी जिवंत नाते होते. शेलीने म्हटल्याप्रमाणे वर्ड्स्वर्थ हा शहरी जीवनातील असंवेदनशील मानवी आयुष्यावरचा एक उतारा होता.......

धर्मचक्राच्या चोवीस आऱ्या म्हणजे धर्मपालनाची चोवीस तत्त्वे. आपले पंतप्रधान आणि चोवीस तत्त्वे! आम्हाला हळूहळू स्लो-मोशनमध्ये सगळे उलगडत गेले

खूप विचार करूनही आम्हाला उत्तर सुचले नाही. शेवटी नड्डाजींचा फोन आला की, मोदीजी स्वर्गाचा कारभार रात्री चालवतात, आणि मुख्य म्हणजे सूक्ष्म रूपात चालवतात. आम्ही चकित झालो. आम्ही म्हटले, ‘नड्डाजी तुम्हाला कसे कळले की, आमच्या डोक्यात हाच विचार चालू आहे?’ नड्डाजी गालातल्या गालात हसल्याचे आम्हाला व्हिडिओ कॉल असल्यामुळे दिसले. नड्डाजी भाजपच्या स्वर्गशाखेचेसुद्धा अध्यक्ष आहेत, हे आम्ही तात्काळ ओळखले.......

कालिदासाच्या काव्यातील एकेक श्लोक सौंदर्यवंत ऐरावतासारखा झुलत राहतो, आणि त्यावर आशयाचा ऐश्वर्यमान इंद्र आरूढ झालेला असतो!

कालिदासाचे ‘मेघदूत’ आपल्याला एका उदात्त जगात घेऊन जाते. ते वाचून आणि अनुभवून झाल्यावर मानवी जीवनाचे सारे श्रेय आपल्या हाती लागले आहे, असे वाटत राहते. जगायचे कशासाठी, तर कालिदासाने सांगितलेले प्रेम करण्यासाठी. जगायचे कशासाठी, तर कालिदासाने रंगवलेला निसर्ग त्याच्या डोळ्यांनी बघण्यासाठी! जगायचे कशासाठी तर, कालिदासाने दिलेला मांगल्याचा घट हृदयामध्ये जपण्यासाठी! ‘जगायचे कशासाठी?’ या प्रश्नाला कालिदास वरील उत्तरे.......

१८ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतील मतदानाची तिसरी फेरी समाप्त झाली. मोदी-योगींचे समर्थक आणि विरोधक या दोघांमध्येही आनंदाची लहर उठली...

खुद्द पंतप्रधानांचे इतके मोठे ‘स्टेक’ असल्याने त्यांचे साहाय्यक श्रीमान अमितजी शहा यांनी सुरुवातीलाच या निवडणुकीतील ‘स्टेक’ वाढवले. त्यांनी लोकांना आणि आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सांगून टाकले होते - ‘येत्या २०२४ मधील लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवायचे असेल तर ‘बीजेपी को उत्तर प्रदेश विधानसभा में जिताना होगा.’ पण, गंमत अशी झाली की, आपण हे कुठून बोलून बसलो असे त्यांना झाले.......

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......

शिरोजीची बखर : प्रकरण सहा - भारतीय राजकारणाचा हा कालखंड उत्तरोत्तर रोचक होत गेला. शिरोजी स्वतः या कालखंडाचा इतिहासकार बनून हे सर्व कांड आपल्यासाठी लिहीत गेला, हे आपले भाग्य!

आज २१२१मध्ये आपण हे सगळे बोलणे सोपे आहे. कारण इतिहासात काय घडले हे आपल्या डोळ्यासमोर आहे. शिरोजी लिखाण करत होता, ते या काळाच्या प्रवाहात राहून. आपल्याला आज जो ‘परस्पेक्टिव्ह’ आहे, तो त्याला नव्हता. परंतु त्या काळात राहून काळाची पावले कुठल्या दिशेने चालली आहेत, हे शिरोजीने बरोबर ओळखले होते. मोदीप्रणित राजकारणाच्या कोलाहलातून देशाच्या हाती काहीही लागणार नाही, हे शिरोजीने ओळखले होते.......

रॉय किणीकर उमर खय्यामच्या रुबायांकडे ओढले गेले. आणि इंग्रजीप्रमाणे मराठी साहित्यातसुद्धा एक ‘लास्टिंग ब्यूटी’ निर्माण झाली!

किणीकरांनी स्वतःला ‘निरंजन आणि गोते खाणारा फाटका पतंग’ असे म्हटलेले आहे. अवघ्या महाराष्ट्राला जे तीस विशेषणे वापरून जमले नाही, ते किणीकरांनी दोन उपमा वापरून साध्य केले. निरंजन म्हणजे ज्याच्यावर काळिमा येऊ शकत नाही असे. शुद्ध! किणीकरांच्या प्रतिभेवर कधी काळिमा आली नाही. कोणी आणू शकले नाही. ना गरिबी, ना हालाखी, ना उपेक्षा, ना अपयश, ना विश्वासघात, ना साक्षात मृत्यूची चाहूल! त्यांची प्रतिभा कधी म्लान झाली नाही.......

अविनाशला एका क्षणासाठी एक गहन सत्य कळले. मानवता हे सर्वोच्च मूल्य आहे. अंतिम मूल्य आहे. बाकी कुठलीही मूल्ये ही महत्त्वाची असली तरी दुय्यम आहेत

बरोबर शंभर वर्षांपूर्वी बखरकार शिरोजी याने बखर लिहायला सुरुवात केली. तो काळ मोठा खळबळीचा होता. हिंदू धर्माच्या रक्षणाची जबाबदारी ‘हिंदुत्ववाद’ नावाच्या राजकीय तत्त्वज्ञानाने घेतली होती. शिरोजी ज्यांचा उल्लेख मोदीजी असा करतो, ते म्हणजे तत्कालीन भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी होत. आज त्यांचे नाव राजकीय विश्लेषक सोडून कुणाला माहीत असणे अवघड आहे. परंतु तत्कालीन भारतात त्यांनी मोठी खळबळ उडवून दिली होती.......

दिगंताला सुगंधित करणारी हास्याची लकेर या जगात असू शकते, यावर विश्वास बसावा, असे वाटत असेल तर फुललेली काटेसावर पाहायला हवी

वसंत म्हणजे आपल्या मनात सौंदर्यामुळे आणि यौवनामुळे लागलेली एक मोहक आग! काटेसावरीच्या फुलांच्या रंगाची आणि त्या फुलांसारखीच मोहक आग! या अर्थाने काटेसावर वसंताचे प्रतीक बनून राहते. शिशिराला वसंताने हळूवार धक्का दिल्यावर काटेसावर फुलते. ग्रीष्माने वसंताला एक छोटासा धक्का दिल्यावर फलधारणा होते. काटेसावरीला शेंगा धरतात. वर्षा ऋतूच्या सुरुवातीला चुकार ढग आकाशात जमू लागतात. त्यांचा एक श्यामल धक्का ग्रीष्माला पुढे .......

इतक्या कोरड्या फांद्यांवर सोन्याची फुले फुलत असतील तर वैराण आयुष्यालासुद्धा स्वप्नांची कमलपुष्पे लगडत असतीलच की! निदान तशा अफवा उठायला काय हरकत आहे?

सौंदर्य माणसाला बोलायला लावते. त्याच्या मनाचे लपलेले पदर त्यालाच उलगडून दाखवते. त्या उलगडलेल्या पदरांच्या कहाण्या गालिब आपल्या ग़ज़लेमध्ये बंदिस्त करतो. त्याचसाठी तर उर्दूचा खडक फोडत फोडत त्याची कविता वाचाविशी वाटते. उन्हात खूप चालून सोनसावरीचे बन गाठायचे आणि उर्दू फोडत फोडत गालिब वाचायचा, दोन्हीचा ‘मकसद’ एकच - सौंदर्याची ओढ! सौंदर्यामुळे आपल्या मनाचे लपून राहिलेले भरजरी पदर आपल्याच पुढे उलगडत जातात.......

आपण आपली राजकीय मते अत्यंत विचारपूर्वक ठरवलेली आहेत आणि आपल्या विरोधकाची मते मात्र त्याच्या स्वार्थी स्वभावाचा परिपाक आहेत, अशी आपली भावना असते...

आजकाल भारत देशात डावे विरुद्ध उजवे अशी दरी तयार झाली आहे. अनेक लोक त्या दरीच्या आहारी गेलेले आहेत. डावे आणि उजवे हा फरक मुख्य मानला जात आहे. परंतु, हान्स आयझेन्कच्या अभ्यासावरून आपल्या लक्षात येते की, कठोर आणि मृदू अंतःकरणाच्या लोकांमधील फरक, उजवा आणि डावा या फरकापेक्षा खूप जास्त महत्त्वाचा ठरतो. खरा राजकीय संघर्ष लोकशाहीवादी उजवे आणि लोकशाहीवादी डावे असा नसतो. खरा संघर्ष जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये असतो.......

२६ जानेवारीला भारतीय शेतकऱ्यांचे काही बांधव चुकीचे वागले. मान्य आहे, पण त्यामुळे त्यांच्या मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कसे चालेल?

विविध स्वरूपाचे आरोप करून नामोहरम करायला शेतकरी म्हणजे काही एखादा विचारवंत नाही. बदनाम करून गप्प बसवता यायला तो काही एखादा नेता नाही. भारतात आजही शेतकरी ७० टक्के आहे. त्याच्या ताकदीचा अंदाज त्याच्यावर आरोप करणाऱ्या लोकांना खरं तर असायला पाहिजे. भारतीय शेतकरी आज केविलवाणा होऊन विचारतो आहे, ‘माझ्याकडे दातावर मारायला पैसा नाहीये, आणि तुम्ही माझ्याकडच्या तुटपुंज्या पैशांच्या जिवावर सुधारणा का करता आहात?.......

माझ्या मनाच्या वैतागलेल्या कॅनव्हासवर अवचटांनी विक्षिप्त आणि विचित्र लोकांचे किस्से सांगून एक अ‍ॅब्सर्ड विनोदाचा सूर्य रंगवला…

डिसेंबरात पाऊस म्हणजे फार होते. आणि डिसेंबरात ऑक्टोबरसारखे उकडायला लागले तर काय करायचे माणसाने? सकाळी उठालो तर आकाश ढगांनी गच्च भरलेले. जुलैमध्ये ढग खाली उतरतात तसे उतरलेले. सगळे क्रेझी वातावरण. ऋतुचक्राच्या एकंदर कॅनव्हासच्या बाहेरचा दिवस हा! काय करावे कळत नाही! सगळा ऱ्हिदम बिघडून जातो मनाचा अशा दिवशी! इतक्यात फोन वाजला, नाव दिसले – ‘सुभाष अवचट’. हा एक सतत कॅनव्हासच्या बाहेर राहणारा माणूस. मी फोन उचलला.......